Description: मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिक मधून जात असताना गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हॅरी गप्पा मारू लागतात. 'माणसाची आजची अवस्था' या विषयावर बोलता -बोलता आयुष्य त्या मागचा अर्थ, शाश्वत आनंद असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात. नाती दृढ करणं असो किंवा या जगाला भेट देणं असो ;गौर गोपाल दास आपल्याला या संदर्भात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रकारे वावरण्याचा दृष्टीने त्यांच्याकडे मौलिक दृष्टिकोन आहे तो जाणून आपणही संपन्न होतो . आज च्या घडीला दास ह्यांचे अगणित अनुयायी आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ - लाईफ कोच पैकी ते एक आहेत. त्यांनी आपले जीवन ज्ञान लक्षावधी लोकांर्यंत पोहोचवलं आहे. जीवन समजून घेताना ... ह्या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातून आपल्याला त्यांचे जीवानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारातून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपखल उपाय सहजगत्या प्राप्त होतात. प्रत्येक जणच आनंदाच्या शोधात असतो आणि आपल्यापैकी बहुतांश लोक हे बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधतात. पण त्या क्षणिक आनंदाचा ठेवा संपल्यावर पुन्हा रितेपणा वाट्याला येतोच. ‘आनंद क्षणभंगुर असतो का?’ अजिबात नाही! उलट हा प्रत्येकाच्या आयुष्यात वाहत राहणारा झरा असतो. हो! पण तो झरा अटू नये, कायम खळाळता राहावा यासाठी प्रत्येकालाच काही ना काही कृती ही करावीच लागते.